मंचर / रवींद्र कोल्हे : बैलगाडा शर्यत बंदी उठवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील विविध राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. बैलगाडा शर्यतीला बंदी असल्याने बैलगाडा शर्यत कोणी भरविली तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र जिथं जिथं बैलगाडा मालकांवर खटले गुन्हे झाले असतील ते गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर येथील येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते बोलत होते. काल गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत बैलगाडा शर्यत भरवली होती. त्याला महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी प्रतिसाद दिला. मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी मंचर येथे बोलतांना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, जिथं जिथं बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुन्हा खटले दाखल होणार नाहीत याची खबरदारी घ्या असे आवाहन त्यांनी केले.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ओझर येथे बैलगाडा मालकांच्या बैठकीत बोलतांना सांगितले की, बैलगाडा शर्यत सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र कोणतेही राजकारण न करता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर सर्वांनी किंबहुना सर्व पक्षांनी पक्षीय राजकारण बाजूला सारून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.