Sunday, June 30, 2024
Homeताज्या बातम्याGovernment Job : आदिवासी विकास विभागातील पदभरती प्रक्रियेला स्थगिती

Government Job : आदिवासी विकास विभागातील पदभरती प्रक्रियेला स्थगिती

नाशिक : आदिवासी विकास विभागातील ‘गट क’ मधील विविध 602 रिक्त पदे भरण्यासाठीची 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन:श्च प्रसिद्ध करावी लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने दिली. (Government Job)

राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा पदभरतीच्या जाहिरातीत समावेश करून, बिंदूनामावली अद्ययावत करुन गट क संवर्गासाठी पुन्हा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पदभरतीसंदर्भातील सविस्तर सूचना दिल्या जातील. (tribal development department)

या पार्श्वभूमीवर पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या बदलांबाबतची नोंद घेण्याबाबत नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Government Job

google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती

भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय