Thursday, September 19, 2024
HomeNewsराज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी १० हजार सानुग्रह अनुदान द्या – कष्टकरी संघर्ष...

राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी १० हजार सानुग्रह अनुदान द्या – कष्टकरी संघर्ष महासंघ

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्यामध्ये लाखोच्या संख्येने बांधकाम कामगार असून विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेले आहे. कोरोना आणि बेरोजगारीमुळे कधी काम मिळते तर नाही अशी अनिश्चितता असल्याने दिवाळी सण साजरा कसा करावा ? असा प्रश्न कामगारांना पडलेला आहे. यात त्यांना दिलासा देण्यासाठी २०२० सलाप्रमाणे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती ने मुख्यमंत्री, कामगार मंत्री, अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये कोरोना कालावधीमध्ये दिपावलीत अर्थसाह्य म्हणून २ हजार ,३ हजार आणि १ हजार पाचशे असे एकूण ६ हजार ५०० रू. असे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले होते . याचा लाभ १२ लाख कामगारांना लाभ झालेला आहे.

कोरोनाच्या भयानक परिस्थिती नंतर अजूनही कामगारांना हातचे काम मिळत नाही. मिळाले तरी ते टिकत नाही अशा परिस्थितीमध्ये बांधकाम कामगार वाढत्या महागाईमुळे आणि बेरोजगारीमुळे संकटात सापडलेला असून यावर्षीची दिवाळी कशी साजरी करावी ? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे त्यामुळे आपल्याकडून प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे . आज अप्पर कामगार आयुक्त पुणे अभय गीते, सहा.कामगार आयुक्त एम. ए.मुजावर यांना भेटून निवेदन दिले. शिष्टंडळात कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक तुषार घटुळे, जनआंदोलनाचे समन्वयक युवराज गटकळ, राजेश माने, यांचा समावेश होता. यावर शासनाला लगेच प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले.

याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील पंधरा लाखापेक्षा अधिक बांधकाम कामगारांना होणार आहे .याबाबत लवकर बैठक होऊन निर्णय झाल्यास राज्यातील बांधकाम कामगारांची दिवाळी सुखात साजरी होणार आहे.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय