Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

घोडेगाव : 70 ते 90 किलोमीटर ची पदयात्रा, गावागावांत संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन

आंबेगाव : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत किसान सभा, आंबेगाव तालुका समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने पदयात्रा सुरू करण्यात आली आहे.

साधारणतः 70 ते 90 किलोमीटर ची ही पदयात्रा सुरू झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे 30 पेक्षा अधिक गावातून ही पदयात्रा येत आहे. सुमारे 4 दिवस चालून ही पदयात्रा गावागावात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करणार आहे. तसेच आदिवासी भागातील विविध धोरणात्मक प्रश्नावर लोकांशी संवाद साधनार आहे. पेसा, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे.

ही पदयात्रा, गावात पोहचल्यावर गावातील नागरिकाना सोबत घेऊन महापुरुषांना अभिवादन करते, व त्यांनंतर संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करून, त्यावर चर्चा घडवून आणत आहे. आहुपे परिसरातून व कोंढवळ परिसरातून अशा दोन ठिकाणाहून ही पदयात्रेला सुरूवात झाली असून आज दुसरा दिवस आहे. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, देविका भोकटे, एस.एफ.आय.चे अविनाश गवारी, दीपक वाळकोली, समीर गारे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू आहे. तसेच दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, रामदास लोहकरे, लक्ष्मण मावळे, बाळू काठे, शंकर काठे, पुंडलिक असवले, रुपाली खमसे व मंगल तळपे इ.कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.


---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles