Photo : Twitter Swati Maliwal |
नवी दिल्ली : शाहदरा जिल्ह्यातील कस्तुरबा नगरमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडल्यानंतर काही लोकांनी पीडित मुलीचे केस कापले आणि तिच्या चेहऱ्यावर काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’, अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
कस्तुरबा नगरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर अवैध दारू विक्रेत्यांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला चप्पलचा हार घालून तोंडाला काळे फासून संपूर्ण परिसरातून धींड काढण्यात आली, पीडितेचा टक्कल करून तिला बेदम मारहाणही करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पटना हिंसा : खान सरांसह ४०० अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल
कस्तूरबा नगर में 20 साल की लड़की का अवैध शराब बेचने वालों द्वारा गैंगरेप किया गया, उसे गंजा कर, चप्पल की माला पहना पूरे इलाक़े में मुँह काला करके घुमाया। मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए। pic.twitter.com/4ExXufDaO3
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 27, 2022
ब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव लागणार
या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी गंभीर दखल घेतली आहे, महिला आयोगाच्या वतीने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यासोबतच कुटुंबाला सुरक्षा देण्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती