Rajkot Fire : गुजरातमधील राजकोटमधील कलावद रोडवरील टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 33 जण होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत, यामध्ये 9 मुले आहेत. उन्हाळ्याच्या शाळेला सुट्या असल्यामुळे या गेमझोनमध्ये मुलांची मोठी गर्दी होती. या घटनेत मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. Rajkot news
शनिवारी 4.30 वा ही आग लागली आणि अर्ध्या तासात आगीने रौद्र रूप धारण केले. गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे कामही सुरू होते. मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि लाकडाचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरली.
राजकोट येथे 2020 मध्ये गेम झोन सुरू करण्यात आला होता. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गेम झोनच्या मालकाला अटक केली असून, राजकोटमधील सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत अनेकांचे मृतदेह पूर्णपणे होरपळले आहेत, त्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड होत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त (ASP) राधिका भराई यांनी सांगितले.
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले, सर्व गेम झोनची (Game zones) तपासणी करण्यात येणार आहे. ‘गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. निष्काळजीपणा आणि मृत्यू याबद्दल सोलंकीविरुद्ध गुन्हा नोंदवला जाणार आहे. इथले बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल.’ असे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.
Rajkot gaming zone Fire
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पाच सदस्यांची विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन केली आहे. राज्य सरकार या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई देणार आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती