Delhi fire : येथील विवेक विहार येथील दुमजली बेबी डे केअर सेंटरमध्ये (Baby care centre) शनिवारी रात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत केंद्रात असलेले 7 नवजात मुलांपैकी सात बाळांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 11.30 च्या सुमारास विवेक विहार पोलिस स्टेशनला एका रुग्णालयात आग लागल्याचा पीसीआर कॉल आला होता. कॉल मिळताच विवेक विहारचे पोलीस अधिकारी तात्काळ पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. Delhi fire
आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अद्याप आगीचे कारण समजलेले नाही. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मुलांना केंद्रातून सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात केली.
इमारतीच्या वरच्या मजल्यावरून इतर लोकांच्या मदतीने 11 नवजात बालकांची सुटका करण्यात आली, त्यांना रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पूर्व दिल्ली प्रगत एनआयसीयू हॉस्पिटल, डी 237, विवेक विहार येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
ही तीन मजली इमारत असून आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केअर सेंटरमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने गंभीर वळण घेतले. केअर सेंटरपासून दूरवर सिलिंडर पडले होते.
हेही वाचा :
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती