पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित ‘गुरूकुलम्’मधे शिक्षण घेणाऱ्या भटके, विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘फळे व खाऊ वाटप’ उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष रविंद्रजी देशपांडे, भाजपा सचिव मधुकर बच्चे,भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे,भटके-विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष गणेश ढाकणे,जेष्ठ कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे,रविंद्र प्रभुणे,तुकाराम चौधरी,नंदू भोगले,प्रदिपजी सायकर,कैलास सानप,प्रशांतजी आगज्ञान,सुभाष मालुसरे,धनंजय शाळिग्राम,मुकुंदर गुरव,गजानन बावळे,आनंद कुलकर्णी,पल्लवी पाठक,ताई कलापुरे,मिथुन बोरगांव,अतुल कांबळे यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.