मनमाड : स्वातंत्र्य सेनानी शाहीर, कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड प्रथम स्मृती पुरस्कार रोख रक्कम रू. ३१ हजार रुपये स्मृती चिन्ह आयटक च्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना ला जाहीर करण्यात आला आहे. (AITK Maharashtra) आशा गट प्रवर्तक चा लढा सातत्याने लढत आहेत. दि. १३ मार्च २०२४रोजी दुपारी १२ वा. मनमाड येथे पल्लवी मंगल कार्यालय सिद्धिविनायक नगर मनमाड येथे आयटक च्या राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. AITK Maharashtra State Asha Group
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कामगार नेते कॉ. महादेव खुडे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून आयटक भाकप नेते कॉ. राजू देसले, किसान सभा नेते कॉ. भास्कर शिंदे , कॉ. दामू अण्णा पाटिल राहतील. अशी माहिती स्वातंत्र्य सैनिक, कॉ. माधवराव गायकवाड बहुउद्देशीय सामाजिक संस्था मनमाड अध्यक्षा कॉ. ॲड. साधना गायकवाड यांनी दिली.
स्वातंत्र्य सैनिक, शाहीर कॉ. कुसूम ताई माधवराव गायकवाड यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन २०२३ मध्ये झाले होते. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या कला पथकात सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष चळवळीत कॉ. माधवराव गायकवाड यांना आयुष्यभर साथ दिली. छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था च्या चेअरमन म्हणून ही काम पाहिले. या पुढील काळात दरवर्षी त्यांच्या नावाने महीला संघटना, तसेच महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिला नेतृत्वाला सन्मानीत करण्यात येणार आहे.हतरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास आशा गट प्रवर्तक उपस्थित राहावे असे आवाहन. ॲड. साधना गायकवाड, निखिल स्वर्गे, भाऊसाहेब गंभीरे, सुभाष बेदमुथा, छबू शिरसाट, श्याम गरुड, ॲड. रिकब जैन, व्ही.डी.धनवटे, देविदास भोपळे यांनी केले आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा