पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मनपा,लायन्स क्लब इंटरनॅशनल, युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इलेट्रोनिक क्षेत्रातील विविध कोर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
कोर्सची माहिती देताना आयोजक प्रिती बोंडे यांनी सांगितले की, नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी उत्तीर्ण गरजू महिला मुलींना पीसीबी असेंम्बली ऑपरेटर, वायर हारनेस असेंम्बली ऑपरेटर, क्रिम्पिंग व कनेक्टर असेंम्बली ऑपरेटर, इलेक्टरीकल टेक्निशियन या कोर्सचे मोफत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. रोज तीन तास आणि दोन आठवड्याचे हे ट्रेनिंग असणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, रांजणगाव येथील उद्योगांमध्ये या महिलांना किमान उत्पन्नाची हमी देणारी नोकरी दिली जाईल.
संयोजक शैलजा सांगळे यांनी सांगितले की, भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशन मूळे विशिष्ट आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण उद्योगाच्या गरजे नुसार दिले जाते. लायन्स कौशल्य विकास केंद्र, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,कामगार भवन जवळ, आंबेडकर चौक, पिंपरी येथे हे प्रशिक्षण मोफत आहे. गरजू मुली आणि महिलांनी खालील पत्त्यावर संपर्क करावा.
शैलजा सांगळे : 9850507155
प्रिती बोंडे : 9764473833
– क्रांतिकुमार कडुलकर
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती