पुणे / प्रा. डॉ. अतुल चौरै : उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील “महिला सक्षमीकरण केंद्र” व “युनिवर्सल हेल्थ सेंटर “पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी संपूर्ण शाररिक तपासणी शिबीर दि. ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी या तपासणी शिबिराचे महत्व अधोरेखित केले. भारतीय समाजात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न हे ज्वलंत आहेत. बऱ्याच वेळा महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व आजार गंभीर झाल्यानंतर त्याकडे पाहतात. कोणत्याही आजाराची सुरवातीलाच निदान झाले तर त्याच्यावर उपचार करणे सोईचे पडते त्यामुळे सदरचे शिबीर हे याच कारणास्तव महत्वाचे ठरते. अशा शिबिरांच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आरोग्याविषयी माहिती करून घ्यावी कारण सुधृढ आरोग्य हि सक्षमीकरणाची वाट आहे, असे त्यांनी सांगितले.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन संपन्न
वेबसिरीजवरील अश्लिल चित्रणावर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीसांकडून कारवाई सुरु
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एन.सी.पवार हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी या शिबिरास शुभेछया दिल्या. शिबीर समन्वयक डॉ. सुशिल जाधव यांनी या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मनापासून आभार मानले व भविष्यात एकत्र काम करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली.
सदर शिबिरात १०० महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात डॉ.सुरुलकर, डॉ.अजित दंताले, स्वरूप पाटील आणि डॉ. स्वाती कडू यांनी महिलांची तपासणी केली. या कार्यक्रमास डॉ. रणदिवे, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, डॉ. हातेकर, डॉ. ढाकणे, प्रतीक्षा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण्याच्या समन्वयक प्रा. आसावरी शेवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले.
महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
ब्रेकिंग : भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त; तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच होणार भरती !