Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोफत अन्नधान्य योजनेमुळे शेतात मजूर मिळत नाही, मोफत योजना बंद करा – भाजप आमदार सुरेश धस

संगमनेर : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनी गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी सरकारकडे मोफत योजना बंद करण्याची मागणी केली आहे.  (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)

---Advertisement---

सुरेश धस (suresh dhas) यांनी ही मते संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वक्तव्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)

सरकारने मोफत योजना बंद कराव्यात सुरेश धस | Suresh Dhas

सुरेश धस म्हणण्यानुसार, “मोफत धान्य मिळत असल्याने अनेक मजूर काम करण्यास तयार होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या घरी जाऊन विनंती करावी लागते. काही ठिकाणी तर हे धान्य दुकानांमध्ये विकले जात आहे, ज्यामुळे योजनेचा गैरवापर होत आहे.” धस यांनी सरकारला या योजनांचा पुनर्विचार करून त्या बंद करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

---Advertisement---

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, विशेषतः बीड, अहमदनगर आणि सांगलीसारख्या ग्रामीण भागात, मजूर टंचाईचा सामना करत आहेत. गेल्या काही वर्षांत परराज्यातील मजुरांची संख्या वाढली असली, तरी स्थानिक मजूर शेतीच्या कामासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. धस यांनी याला मोफत योजनांशी जोडले आहे. ते म्हणाले, “मोफत धान्यामुळे मजुरांना कामाची गरज वाटत नाही. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles