Monday, December 23, 2024
HomeNewsडायनासोर च्या अंड्यातील भ्रूणाचे सापडले जीवाश्म

डायनासोर च्या अंड्यातील भ्रूणाचे सापडले जीवाश्म

बीजिंग : दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचे एक जीवाश्म सापडले असून या अंड्यातील भ्रूणाचे जीवाश्मही अतिशय सुरक्षित आहे. हे अंडे सुमारे 7 कोटी 20 लाख वर्षांपूर्वीचे आहे. अंड्यातील या डायनासोर च्या पिल्‍लास ‘बेबी यिंगलियांग’ असे नाव देण्यात आले आहे.

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

चीनच्या जियांग्शी प्रांतातील गांझोऊ शहरातील शाहे औद्योगिक पार्कमध्ये ‘हेकोऊ फॉर्मेशन’च्या खडकांमध्ये हे महत्त्वपूर्ण जीवाश्म आढळले होते. बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या जीवाश्म संशोधकांनी म्हटले आहे की हे भ्रूण ओविराप्टोरोसॉर प्रजातीशी संबंधित आहे. या प्रजातीमधील डायनासोरना चोच होती व दात नव्हते.

“झोंबिवली” मुंबईतील पाणी प्रश्नाची गोष्ट!

हे पंख असणारे डायनासोर होते जे आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या खडकाळ भागात अस्तित्वात होते. त्यांची चोच आणि शरीराचा आकार स्थानपरत्वे वेगवेगळा होता. हे भ्रूण आतापर्यंतचे सर्वात संपूर्णावस्थेत असलेले डायनासोर भ्रूण ठरले आहे. त्याचे डोके शरीराखाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय