Photo : Facebook / Lalu Prasad Yadav |
पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते लालू यादव यांना सोमवारी चारा घोटाळ्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.
दोरांडा कोषागारातून 139.35 कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्या प्रकरणी सीबीआय कोर्ट रांचीचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावली.
यावेळी लालू प्रसाद यादव यांच्यासह या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी 37 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या शिक्षेसोबत 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी जवळपास अर्धी शिक्षा म्हणजेच अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता केवळ अर्धी शिक्षा पूर्ण होऊ द्यावी, यासाठी ते न्यायालयात दाद मागणार आहे.
पंजाब निवडणूक : सोनू सूदला मतदान केंद्रावर जात असताना रोखले, वाहनही केले जप्त
दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 दोषींना दोषी ठरवले होते. आज सोमवारी शिक्षेची सुनावणी होण्यापूर्वीच लालू यादवांची प्रकृती खालावली. त्याचा रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढली, अशी माहिती डॉक्टर विद्यापती यांनी दिली. त्यांच्यावर रांची येथील रिम्समध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना तेथेच ठेवण्यात यावे, असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 जागांसाठी भरती