Monday, December 23, 2024
Homeराज्यराज्यातील विविध ठिकाणी आकाशात दिसले आगीचे लोळ, आकाशातून पडली रहस्यमय वस्तू

राज्यातील विविध ठिकाणी आकाशात दिसले आगीचे लोळ, आकाशातून पडली रहस्यमय वस्तू

चंद्रपूर : राज्यातील विविध जिल्ह्यात (2 एप्रिल) रोजी सायंकाळी आकाशातून आगीचे लोळ जाताना लोकांना दिसले. या घटनेनंतर काही वेळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे देखील वातावरण तयार झाले होते.

विदर्भ, मराठवाडा तसेच खान्देशाच्या काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान आकाशातून आगीचे लोळ बराच वेळ जमिनीच्या दिशेने झेपावत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आकाशात नेमकी काय घडामोड होत आहे, आणि हे लोळ कशाचे आहे, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काहीच कल्पना येत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेचा वस्तू स्वरूपातला भाग चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात लाडबोरीमध्ये कोसळला आहे. मोठा आवाज करत ही रिंगसदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. 

दरम्यान, अंदाजे 10×10 फूट आकाराची ही रिंग तारा तुटल्यासारखा भास होत गडगडाटासह कोसळली. त्यामुळे घाबरुन जात लाडबोरीच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. थोड्या वेळाने घटनास्थळी शोध घेतल्यावर ही रींग आढळून आली आणि त्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली. सध्या ही रिंग वस्तू सिंदेवाही पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.

अवकाशात खगोलीय घटना घडली की उपग्रहाचे अंतराळातील तुकडे आहेत हे अद्याप स्पष्ट नाही, एखादा कृत्रिम उपग्रह पाडण्याआधी तशी सूचना त्या देशाला दिल्या जातात. या घटनेबाबत अशी कुठलीही पूर्वसूचना नव्हती, त्यामुळे हा उपग्रह आहे की उल्कापात हे सांगणं सध्यातरी कठीण आहे.  मात्र, रिंगसदृश्य वस्तू पाहून हे कृत्रिम उपग्रहाचे भाग असल्याचे खगोल अभ्यासक सांगत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय