Wednesday, December 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअखेर बहुचर्चित चित्रपट 'नवरदेव B Sc. Agri'चे पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ

अखेर बहुचर्चित चित्रपट ‘नवरदेव B Sc. Agri’चे पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ

पुणे: गेल्या काही वर्षांपासून मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. विशेष: ग्रामीण आणि शेतकरी असलेल्या मुलांचे लग्न होणे फार जास्त कठीण होऊन बसले. 35 वय झाले तरीही अनेक मुले हे ग्रामीण भागात बिनालग्नाचे आहेत.कोणत्याच मुलीला शेतकरी नवरा आणि खेड्या गावात राहण्याची इच्छा नाहीये. याचा परिणाम असा झालाय की, ग्रामीण भागातील मुलांचे लग्नच होत नाहीयेत. प्रत्येक मुलीला पुणे आणि मुंबईचाच मुलगा हवाय. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून अत्यंत मोठा होत जातोय. आता याच ज्वलंत प्रश्नावर चक्क एक अस्सल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीया येतोय.

या चित्रपटाचे नाव ‘नवरदेव B Sc. Agri.’ आहे. विशेष म्हणजे या धमाकेदार चित्रपटाचे नुकताच एक पोस्टर रिलीज झालंय. अत्यंत खास पद्धतीने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्वांचा आवडता अभिनेता अर्थात क्षितीश दाते हा नवरदेवाचा भूमिकेत धमाल करताना दिसणार आहे. पुण्यात पोस्टर लाॅन्चचा सोहळा हा पार पडलाय.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे आहेत. हा चित्रपट चांगलाच धमाका करेल हे सांगितले जातंय. हा चित्रपट 26 जानेवारी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. हा बहुचर्चित चित्रपट नक्कीच ठरताना दिसतोय. आता पोस्टनंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.या चित्रपटात तगडी कलाकारांनी टीम असून क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक धमाका करताना दिसतील. आज रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्षितीश दाते हा मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार असल्याचे दिसतंय. हा नक्कीच अनेकांच्या आवडतीच्या विषयावर आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय