Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या घोषणा केली असून, फेब्रुवारी महिन्याच्या निधीसाठीच्या चेकवर त्यांनी सही केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
फेब्रुवारीचा हप्ता वेळेत मिळणार (Ladki Bahin Yojana)
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सुरू होती. त्यामुळे महिलांना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याकडे लक्ष लागले होते. आता मात्र 21 फेब्रुवारीपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सरकारने महिला आणि बालविकास विभागाला 3,490 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
५ लाख महिला अपात्र, सरकारला 945 कोटींची बचत
राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार 5 लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. जानेवारी अखेर या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2.41 कोटींवर आली होती. फेब्रुवारी महिन्यात आणखी काही महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुटुंबात चारचाकी असलेल्या आणि टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत
पडताळणीअंती काही अपात्र महिलांना यापुढे हप्ता मिळणार नाही. मात्र, जे पैसे आधीच वितरित झाले आहेत, ते परत घेतले जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
या योजनेचा हप्ता वेळेवर मिळणार असल्याने लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली असून, यामुळे लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हे ही वाचा :
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!
‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार