Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपंतप्रधान आवास योजना अर्जासाठी मुदत वाढवा - कामगार नेते काशिनाथ नखाते

पंतप्रधान आवास योजना अर्जासाठी मुदत वाढवा – कामगार नेते काशिनाथ नखाते

दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याने मनपा आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली मागणी.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि. ११
– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या ९३८ सदनिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ जून पासून ते २८ जुलै पर्यंत मुदत होती त्यानंतर उद्या १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली मात्र केवळ ८३८३ अर्ज आले आहेत अजूनही अनेक अर्जदार बाकी आहेत त्यांनाही या घरांची संधी उपलब्ध करून व्हावी यासाठी १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे.


तहसील कार्यालयाकडून दाखले उपलब्ध होत नाहीत म्हणुन अजूनही अनेक कामगार, नागरिक अर्ज करण्याचे बाकी आहेत. सदरचा फॉर्म भरण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट व उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचा दाखला हे महत्त्वाचे असून सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी आहेत. तहसीलदार कार्यालयात अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे यांचेकडून प्रमाणपात्रासाठी २० ते २५ दिवस लागत आहेत .

यामुळे अनेक लोकांची इच्छा असतानाही अजून अर्ज करू शकले नाहीत केवळ त्यांना आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे ते अर्ज करून शिकलेले नाहीत यापूर्वीच्या ज्या ज्या वेळी अशा प्रकारे अर्ज मागवण्यात आले त्या वेळेला ४० ते ५० हजार अशा मोठ्या प्रमाणात अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते मात्र आता केवळ ८३८३ अर्ज प्राप्त झाले आहेत . सध्याच्या कालावधीमध्ये ह्या प्रमाणपत्राची अट असल्यामुळे व ते वेळेत उपलब्ध न होत असल्यामुळे अनेक नागरिकांचे अर्ज करणे बाकी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी व घरांची संधी जाऊ नये म्हणून सदरचे अर्ज करण्यासाठी १० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे नखाते यांनी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय