पिंपरी : वर्किंग पिपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुंबई येथे जागतिक महिला दिनानिमित्त समता रॅली आयोजित करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील कष्टकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या.
मुंबई – ८ मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त आज मुंबईत कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड सह इतर जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
चिंचवड शाहूनगर मध्ये महिलांची भव्य लायन्स बाईक रॅली
मुंबईसह सह संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यात बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ फोर्ट येथे बांधलेल्या प्रसिद्ध हुतात्मा स्मारकास रॅली अभिवादन करून सुरुवात झाली. समान काम – समान हक्क किमान व समान वेतन या मागण्या घेऊन यशस्वी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, कामगार नेते काशिनाथ नखाते, सर्वांसाठी घरे चळवळीचे नेते बिलाल खान, चैताली भंगाळे, विजया पाटील, सविता कर्पे, प्रियंका काटे, सुनिता दिलपाक, मनीषा कोकाटे, सविता आरती हनवते, मनीषा कोकाटे, आशा वायकर, नर्मदा गायाकवाड, सालिम डांगे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे, कालिदास गायकवाड आदीसह कष्टकरी उपस्थित होते.
मुळा-मुठा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, असे असेल नियोजन !
यावेळी माधुरी जलमूलवार म्हणाल्या, आजच्या प्रगत युगामध्ये ही महिला आणि पुरुष असा भेदभाव केला जात आहे. पुरुषांना जास्त पगार तर महिलांना कमी पगार त्यांची हजेरी वेगळी यांची हजेरी वेगळ महिलांच्या हजेरी वेगळे असा भेदभाव केला जातो. आम्हाला किमान आणि समान वेतन सर्वांना सारखाच पाहिजे. महिलां- पुरूषातील भेदभावाची दरी दुर करुन समता निर्माण झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
चंदन कुमार यांनी कामगारांना कायद्याचे कवच देऊन त्यांच्यासाठी सुरक्षितता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे प्रयत्न करावे लागतील.
या प्रसंगी पाहिजे सफाई कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, महिला रिक्षा चालक आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. प्रस्ताविक नम्रता जाधव यानीं तर आभार सुनिता दिलपाक यानीं मानले.