Friday, December 20, 2024
HomeNewsएम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियन खडकी (डिफेन्स) च्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद व सरचिटणीस पदी...

एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियन खडकी (डिफेन्स) च्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद व सरचिटणीस पदी विशाल डुंबरे यांची निवड

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : खडकीतील सेंट्रल आरमोर्ड फायटिंग व्हेहिकल डेपो (CAFVD) युनिट खडकी मधील एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज युनियनला ही संघटना संलग्न आहे. भारतातील संरक्षण उत्पादन कारखान्यातील कामगारांची ही संघटना १० जानेवारी १९४८ साली स्थापन झाली. या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीय सैन्यदलासाठी आवश्यक रणगाडे, चिलखती वाहने, दारुगोळा, मशिनगन्स, तोफगोळे ईई शेकडो उत्पादने साधने निर्माण करणाऱ्या सरकारी कारखान्यातील कामगारांनी राष्ट्रीय भावनेतून युनियनची स्थापना केली.

देशातील ४११ युनियनचे मुख्य कार्यालय खडकी येथे आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून संरक्षण दलाच्या गरजा पुरवणारे देशभरात अनेक कारखाने आहेत. सेंट्रल आरमार्ड डेपो येथे युद्धभूमीवरील रणगाड्याचे मेंटेनन्स या ठिकाणी केले जाते. भारतीय सैन्यदलाच्या मानकाप्रमाणे सलग १० हजार किमी नंतर प्रत्येक रणगाडा इथे देखभालीसाठी येतो. सरकारने खरेदी केलेल्या रणगाड्याची संपूर्ण क्वालिटी, डिलिव्हरी खडकी येथून होते. खडकी येथील हजारो इंजिनिअर, कर्मचारी, तंत्रज्ञ सात दशकाहून जास्त वर्षे सेना दलाच्या गरजा पूर्ण करत आहेत.

सन २०२२-२३ साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी सलिम सैय्यद तर सरचिटणीस पदी विशाल डुंबरे यांची निवड झाली. मोहन होळ, आदित्य वावळे, रामचंद्र होळकर, लक्ष्मण भोईर, सत्यवान शेडगे, सरफराज सौदागर, महेश भालेराव, चारूहास शिंदे, नवनाथ घिगे, सुनील विश्वकर्मा, बी. जी. यादव, सतीश सात्रस, राहुल गायकवाड, किरण ननावरे, एस.एफ.सय्यद यांची कार्यकरिणीमध्ये एकमताने करण्यात आली.

Lic

जाहिरात 1
संबंधित लेख

लोकप्रिय