पुणे/क्रांतिकुमार कडुलकर
समाजातील उपेक्षित घटक म्हणून देहविक्री करणाऱ्या महिलांकडे पहिले जाते.उतार वयात या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक लोकांचे या विषयावर मतभेद आहेत; या मतभेदांमध्ये समाजातील हा घटक भरडला जातो. यांच्या मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. या महिलांचे दुखः व अडचणी समजावून घेणारे कोणीही नाहीत. या महिलांच्या दोन वेळच्या अन्नाचा व आरोग्याचा प्रश्न मिटावा यासाठी मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशन कार्य करत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवीण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत फरासखाना पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैयद शब्बीर यांनी शहरातील बुधवार पेठेतील लालबत्ती परिसरातील महिलांसाठी महा एनजीओ फेडरेशन व मंथन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोषण आहार वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.
डॉ. चित्रलेखा राजुस्कर, ज्येष्ठ प्राध्यापिका कर्वे समाज सेवा संस्था यांनी मंथन फाउंडेशन करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे कारण जिथे कोणीही काम करायला पुढे येत नाही तिथे मंथन फाउंडेशन काम करत आहे.
राजेंद्र तापडिया यांच्यासारखे दानशूर व्यक्तीमत्व असे उपक्रम राबविण्यासाठी मदत करत आहेत.अशा दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने आज संस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करत आहे,असे मत महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केले.
लालबत्ती परिसरातील ९० ज्येष्ठ वृद्ध व एचआयव्ही सह जगणाऱ्या महिलांना समूपदेशन व आरोग्यासाठी प्रयत्नशील राहत प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो किराणा सुपूर्द करण्याचे अभिवचन शेखर मुंदडा यांनी दिले होते. या वचनाची पूर्तता करत महा एनजीओ फेडरेशनने मंगळवारी शहरातील बुधवार पेठेत महिला समुपदेशन व पोषण आहार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक महिन्यास आपण जवळपास एक लक्ष रुपयांचा पोषण आहार देत आहोत.
मंथन फाउंडेशन या परिसरातील महिलांसाठी मागील अनेक दशकांपासून कार्य करत आहे. या संस्थेस येणाऱ्या समस्या लक्षात घेत महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी संस्थेच्या माध्यमातून उपक्रमांस संरक्षण दिले. हा उपक्रम दर महिन्यात आयोजित केला जातो.
सर्वांचे आभार ‘मंथन फाउंडेशनच्या’ अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांनी मानले.
या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैयद शब्बीर, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. चित्रलेखा राजुस्कर,संचालक मुकुंद शिंदे, सौ प्रणिता जगताप, महेश सोनी, संदेश मानकर, आशा भट्ट अध्यक्षा मंथन फाउंडेशन, महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले आदी मान्यवर, मंथन चे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.