Thursday, September 19, 2024
HomeNewsवाढदिवसानिमित्त पालकांकडून शैक्षणिक साहित्य शाळेस भेट

वाढदिवसानिमित्त पालकांकडून शैक्षणिक साहित्य शाळेस भेट

पुणे : भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत छोट्या चिमुकल्यांचे “वाढदिवस पालकांसमवेत साजरे करण्याची जपली जाते अनोखी परंपरा आहे. वाढदिवसानिमित्त पालकांकडून शैक्षणिक साहित्य शाळेस भेट दिले जाते.

विद्यार्थ्यांना आनंद प्राप्ती व्हावी, चांगले संस्कार व्हावे, आदर्श, नित्य मूल्य रुजावीत, शाळा आणि पालक यांची दृढ नाते निर्माण व्हावे, एकात्मता प्रस्थापित व्हावी, शाळा एक सामाजिक संस्था बनली, या उदात्त दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत केले जाते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात पालक, शिक्षक, संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी यांच्या समवेत मोठ्या उत्साहातसाजरा केला जातो.

शाळेतील या अनोख्या परंपरेचा भाग म्हणून नुकताच बुधवार दिनांक १२/१०/२०२२ रोजी कुमारी राजनंदिनी आदिनाथ शिंदे या विद्यार्थिनीचा वाढदिवस सहकुटुंब- सहपरिवार शाळेमध्ये साजरा करण्यात आला.

राजनंदिनी च्या कुटुंबीयांनी शाळेसाठी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप वाढदिवसानिमित्त केले. याच्यातून पालकांविषयी शाळेविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्या विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, प्रवीण भाकड यांनी केले.

Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय