नवी दिल्ली : भारताला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला समाप्त होत आहे. त्यांचे उत्तराधिकारी ठरण्यासाठी १८ जुलै रोजी मतदान पार पडले होते.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रपती पदाच्या या मतमोजणीला संसद भवनात आज सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीसाठी १८ जुलैला ९९ टक्क्यांहून अधिक मतदान होते. आज सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर १५ व्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैला होईल.
दरम्यान, या निवडणुकीसाठी गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुडुचेरी, सिक्कीम, तामिळनाडूमध्ये १०० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असून एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला होता.
हेही वाचा
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवार यांचा मोठा निर्णय
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश