Friday, July 5, 2024
HomeNewsलोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम-ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्यावतीने भोसरी येथील कै.धोंडीबा फुगे विरंगुळा केंद्र क्रीडा संकुल दिघी रोड येथे पुणे जिल्हास्तरीय एक दिवसीय जलद रॅपिड खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार अतुल बेनके,आमदार निलेश लंके,माजी आमदार विलास लांडे,शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या हस्ते होणार असून आमदार अण्णा बनसोडे माजी महापौर योगेश बहल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,युवक शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न होणार आहे.

पुणे जिल्हा बुद्धिबल सर्कल यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत रोख पारितोषिके आणि ट्रॉफी आणि मेडल्स तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा रविवार 25 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेदरम्यान खेळवली जाणार आहे. सदर स्पर्धेत खेळाडूंना भाग घ्यायचा असल्यास त्यांनी 9970187481 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. तसेच स्पर्धेत भाग घेण्याकरिता व अधिक माहिती साठी

chesstournament.in/chessevent/ या वेबसाइटवर संपर्क करावा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय