Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : दिवाळी निमित्त गोरगरीबांना मिठाई व कपडे वाटप 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुप व लोकसहभागातुन प्रत्येक वर्षी दिवाळीला विविध ठिकाणी जाऊन गरजुना कपडे, मिठाई, फराळ आदी देऊन त्यांची दिवाळी साजरी केली जाते.

---Advertisement---

या वर्षी सुद्धा मधुकर बच्चे युवा मंच वतीने ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ या संस्थेकडे लहान मुले-मुली व पुरुष, महिला यांच्यासाठी सर्व प्रकारचे कपडे सुपूर्द करण्यात आले.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने व 

---Advertisement---

भाजपा शहर अध्यक्ष माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी गणेश बच्चे, अर्चना बच्चे आदी उपस्थित होते. ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद, दिलीप चक्रे, देविदास गुरव, शंकरराव कुलकर्णी आदींनी मदत स्विकारली. मधुकर बच्चे दर महिन्याला विविध प्रकारे उपेक्षित घटकांना मदत करत असतात.

लोकांकडून या उपक्रमास भर भरून प्रतिसाद मिळतो. यात सर्व प्रकारची कपडे, भांडी, किराणा, आदी आत्यावश्यक सामान लोकसहभागातून जमा करून गरजूना वाटण्यात येते.

मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुपचे पोपट बच्चे, गणेश बच्चे, रोहिणी बच्चे, अर्चना बच्चे, सिंधू बच्चे, अक्षय गारगोटे, रंजना गारगोटे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे काजल बच्चे – गावडे आदी सदस्य या उपक्रमात बाराही महिने सक्रिय सहभाग घेतात. 

हा उपक्रम अविरत सुरु ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून अनेक नागरिक श्यक्य तेवढी मदत करीत असतात.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles