मुंबई : जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी आता वाघमारे यांच्यावर असणार आहे.
कोण आहेत Dinesh Waghmare ?
सन 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले दिनेश वाघमारे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नियुक्तीपूर्वी त्यांनी महाराष्ट्र गृह विभागात प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या प्रशासनिक कौशल्याचा आणि नेतृत्वगुणांचा अनुभव लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने त्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला.
दिनेश वाघमारे यांची निवड केल्याने राज्यातील निवडणुका अधिक पारदर्शक व व्यवस्थित पार पडतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, 16 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यास राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा :
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक