Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे अडचणीत आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती स्वत: अजित पवार यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीटर व्दारे माहिती दिली आहे, काल मी कोरोनाची चाचणी केली, ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असे ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना देखील काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ते घरी परतले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles