Friday, March 29, 2024
Homeजिल्हाशिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी संघर्ष करण्याची गरज - सोमनाथ निर्मळ 

शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी संघर्ष करण्याची गरज – सोमनाथ निर्मळ 

एसएफआयचे १८ वे सोलापूर जिल्हा अधिवेशन संपन्न !

लष्कराचे कंत्राटीकरण करणारी अग्निपथ योजना रद्द करा – रोहिदास जाधव

सोलापूर : आज दिनांक २५ जून २०२२ रोजी एसएफआयचे १८ वे सोलापूर जिल्हा अधिवेशन संपन्न झाले. शहरातील दत्त नगर येथील संघटनेच्या जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या अधिवेशनाची सुरुवात संघटनेचे ध्वज फडकावून आणि शहीदांना अभिवादन करून झाली. या अधिवेशनाचे उद्धाटन एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी केले.

यावेळी उद्घाटन सत्रात बोलताना सोमनाथ निर्मळ म्हणाले, आज देश एका बिकट परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी संघर्ष करण्याची गरज आहे. तसेच यासाठी एसएफआय संघटना अजून जोमाने विद्यार्थ्यांमध्ये घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होतात.

तर यावेळी एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव म्हणाले, लष्कराचे कंत्राटीकरण करणारी अग्निपथ योजना विद्यार्थी व युवक विरोधी आहे. ही योजना रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे. असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी माजी राज्य सचिव दत्ता चव्हाण, राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे आणि पूजा कांबळे यांनी अधिवेशनास मार्गदर्शन केले. तसेच डीवायएफआयचे जिल्हा सचिव अनिल वासम, जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष शेवंताताई देशमुख व जिल्हा सचिव शकुंतला पाणीभाते, एसएफआयच्या माजी जिल्हा सचिव नम्रता निली यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनात मागील कार्याचा तसेच शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. या अधिवेशनाने २१ सदस्यांची नवीन सोलापूर जिल्हा कमिटी निवडली. नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून अतुल फसाले आणि जिल्हा सचिव म्हणून मल्लेशम कारमपुरी यांची एकमताने निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

एसएफआय सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून अतुल, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव राहुल जाधव, सचिव मंडळ सदस्य दत्ता हजारे, विजय साबळे, जिल्हा कमिटी सदस्य म्हणून प्रशांत आडम, रोहित सावळगी, अनिल बोगा, श्रुतिका बल्ला, तौसीद कोरबू, प्रिया कीर्तने, प्रशांत जाधव, उमेश पांढरे, प्रतीक जाधव, नेहा वाघमोडे, सोनाली कुंभार, रोहित धोत्रे.

हा अधिवेशनातून पूजा कांबळे, शामसुंदर आडम, पल्लवी मासन, राहुल भैसे, राजेश्वरी पडाल, पूनम गायकवाड, प्रभुदेव भंडारे, अश्विनी मामड्याल, दुर्गादास कनकुंटला, लक्ष्मी रच्चा, ओंकार यादगिरीकर, शाहनवाज शेख, लक्ष्मीकांत कोंडला यांनी निवृती घेतली.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय