Friday, November 22, 2024
Homeजिल्हाप्रभाग पद्धती रद्द करून "एक वार्ड, एक नगरसेवक" या पध्दतीने निवडणूक घेण्याची...

प्रभाग पद्धती रद्द करून “एक वार्ड, एक नगरसेवक” या पध्दतीने निवडणूक घेण्याची मागणी

नागपूर : प्रभाग पद्धती रद्द करून “एक वार्ड, एक नगरसेवक” या पध्दतीने निवडणूक घेण्याची मागणी रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात “एक वार्ड, एक नगरसेवक” हे रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने चालवण्यात आलेले स्वाक्षऱ्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी नागपूर यांना देण्यात आले. यात 2500 नागरिकांनी आपल्या सह्या केल्या. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र व मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले.

रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने गेल्या वर्षभर नागपूर शहरातील विभिन्न भागात महानगरपालिकेच्या निवडणुका या प्रभाग पद्धती ऐवजी वार्ड पद्धतीने लढवल्या जाव्यात यासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

अरूण लाटकर म्हणाले, “प्रभाग पद्धतीमुळे सर्वसामान्य उमेदवार निवडणूक लढू शकत नाहीत. तसेच, एकाच निवडणुकीसाठी तीन किंवा चार मते एका नागरिकाला द्यावे लागणे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उदृक्त केलेल्या एक नागरिक एक मत याचा देखील अपमान आहे.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण लाटकर व रामेश्वर चरपे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अरुण वनकर, जनता दल धर्मनिरपेक्षेचे डॉक्टर विलास सुरकर, रमेश शर्मा विजय खोब्रागडे, एस.यु.सी.आय चे माधव भोंडे उपस्थित होते.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय