Wednesday, April 24, 2024
Homeजिल्हाअक्षय भालेराव हत्येतील गुन्हेगारांना कडक शासन करा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार –...

अक्षय भालेराव हत्येतील गुन्हेगारांना कडक शासन करा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार – जाती अंत संघर्ष समितीचा इशारा

सोलापूर : अक्षय श्रावण भालेराव या दलित तरुणाच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करत गुन्हेगारांना कडक शासन केलेच पाहिजे अशी मागणी जाती अंत संघर्ष समिती च्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे समिती चे राज्य समिती सदस्य कॉ.दीपक निकंबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात असे म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय श्रावण भालेराव याची हत्या ही जातीय श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून झाली आहे. या अमानुष कृत्याचा जाती अंत संघर्ष समिती याचा तीव्र निषेध करत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी ही मागणी करत आहे.

या प्रकरणी अक्षयचा भाऊ आकाश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून या हत्येमागे केवळ वरिष्ठ जातीय अहंकार असल्याचे दिसून येते. मृत अक्षय आणि त्याचे कुटुंबिय दलित असून मोलमजुरी करून गुजराण करतात. या वस्तुस्थितीवरून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचा जीव घेणे हा आपला हक्कच असल्याची अजूनही तथाकथित वरिष्ठ मालमत्ताधार जातीयांमध्ये भावना आहे. भारतीय संविधानाला हे अजिबात मान्य नाही.

या गावात आजवर डॉ. आंबेडकर जयंती साजरी होत नव्हती. या वर्षी ती प्रथमच साजरी करण्यात अक्षयने पुढाकार घेतला होता. त्या कारणाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या बाबतीत तेथील पोलीस खात्याची आणि प्रशासनाची काय भूमिका होती, हेही तपासून पाहिले पाहिजे.

जाती अंत संघर्ष समिती भालेराव कुटुंबियांच्या अतीव दुःखात सहभागी आहे. या निर्घृण कृत्याच्या पार्श्वभूमीवर आकाश आणि भालेराव कुटुंबियांना पोलिसांनी संरक्षण पुरवले पाहिजे. या प्रसंगाच्या परिणामी या कुटुंबियांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाने भालेराव कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत तातडीने केली पाहिजे अशी मागणी पक्ष करत आहे.

या गुन्हेगारी कृत्यामुळे बोंडार हवेली गावातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. त्यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. गावातील सर्व जातींमधील जनतेला सोबत घेत गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही म्हटले आहे.

यावेळी शिष्टमंडळात कॉ.दीपक निकंबे, अँड.अनिल वासम, शंकर म्हेत्रे, मारेप्पा फंदलोलु, नरेश दुगाणे, सूर्यकांत केंदले, श्रीकांत कांबळे, अभिजित निकंबे, विरेंद्र पद्मा, कुरमेश म्हेत्रे, योहान सातालोलु, तानाजी जाधव,प्रदीप मरेड्डी पांडुरंग म्हेत्रे आदी उपस्थित होते.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय