Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबिल्डर धार्जिण्या धोरणामुळे बांधकाम मजुरांचा मृत्यू - बाबा कांबळे

बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे बांधकाम मजुरांचा मृत्यू – बाबा कांबळे

मुख्य मालक, बिल्डर भागीदार कंपनी, इंजिनीयर सह संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : येरवडा येथील ब्लू ग्रास बांधकाम साइटवर काम करणाऱ्या सात मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर जखमी आहेत, याठिकाणी प्रशस्त असं मॉल चे बांधकाम सुरू असून मॉल संस्कृती राबवण्यासाठी बिल्डर धार्जिण्या भूमिकेमुळे राज्यकर्ते शासनकर्ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब बांधकाम मजुरांचा जीव जात आहे. यामुळे बांधकाम साइटवरती कठोर कायदे करून बांधकाम मजुरांचे प्राण वाचवले पाहिजेत, अन्यथा कष्टकरी कामगार पंचायत, बांधकाम ठेकेदार पंचायत च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे दिला.

यावेळी वाहतूक पंचायतीचे ठेकेदार बांधकाम पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष राजू साव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष रंजित सहा, उपाध्यक्ष दिनेश यादव, कार्यध्यक्ष मुकेश ठाकूर, अभयसिंग राजपूत, प्रमोद राजपूत आदी उपस्थित होते.

यंत्रणेची बेपर्वाई आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष; हेच बांधकाम कामगारांच्या मृत्युचे खरे कारण – सिटू

भाजप नेते गजानन चिंचवडे यांचे निधन !

कांबळे म्हणाले, अपघात झालेल्या ठिकाणी पंचायत पदाधिकार्‍यांनी भेट देऊन या ठिकाणी झालेल्या अपघाताची पाहणी केली असता या ठिकाणी स्टील वाचवण्यासाठी व बिल्डरचा फायदा करण्यासाठी बांधकाम मजुरांचा अपघात झाला, असे प्रथमदर्शनी लक्षात येते. यामध्ये फक्त ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला असून बिल्डर विकासक भागीदार ऑडिटर इंजिनियर डिजाइनर सह संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी व इतरही संबंधित अधिकारी, यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाले असल्याचं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे. 

याबाबतची सखोल चौकशी करून रात्रीच्या वेळी बांधकाम करण्याची येवडी इमर्जन्सी का केली. त्याचबरोबर सुरक्षा साधने का पुरवले गेले नाही या बाबींची सखोल चौकशी करून या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत आणि मृत्य व जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना नुसकान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

याबाबत पंचायत च्या वतीने देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर संबंधित मंत्री व अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवड हे देशातील अत्यंत प्रगतीपथावर असलेल्या शहर असून शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम साईट सुरू असून मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. या बांधकाम साइटवरती सातत्याने अपघात होत असून अनेक छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना प्रत्येक दिवशी घडत आहे. अनेक बांधकाम मजुरांचे जीव जात आहेत बिल्डरांच्या फायद्याची भूमिका न घेता सर्वसामान्य बांधकाम मजुरांची बाजूदेखील पुढे आले पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिकाअसल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

कामगारांचा जीव स्वस्त झाला ? कामगार मृत्यू होणारे प्रकल्प पाच वर्षासाठी बंद करा – काशिनाथ नखाते


संबंधित लेख

लोकप्रिय