डॉ.राजेंद्र वाबळे यांना निलंबित करा – चेतन गौतम बेंद्रे
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अत्यावश्यक विभागाच्या ‘कॅश काउंटर’ वर बोगस पावतीद्वारे लाखो रुपयाची रक्कम कंत्राटी कर्मचा-याने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी भरलेल्या रोख रक्कमेवर डल्ला मारत त्यांना बोगस पावत्या दिल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. आम आदमी पार्टी च्या वतीने डॉ. राजेंद्र वाबळे यांना निलंबित करण्याची मागणी आप पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले आहे.
1. बी. व्ही. जी ने पुरवलेले सर्व कर्मचारी वर्ग ४ चे म्हणजे सफाई कर्मचारी असताना, कॅश कॉउंटर वर पिंपरी चिंचवड मनपा च्या आस्थापनवरील लिपिक किंवा लेखापाल जी जबाबदारी असताना वाय. सी. एम प्रशासन ने सफाई कर्मचारी ला ती काम करण्याची जबाबदारी कशी काय दिली?
2. बी. व्ही. जी च्या कॉन्ट्रॅक्ट च्या कर्मचाऱ्याकडून सरळ सरळ कॅश कॉउंटर वर मागच्या ९ महिन्यापासून चोरी झाली असताना त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्या ऐवजी फक्त अंतर्गत बदली करून डॉ. राजेंद्र वाबळे या सर्व प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम आदमी पार्टी च्या वतीने आम्ही आयुक्त शेखर सिंह तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना विनंती करतो की संपूर्ण कारवाई होई पर्यंत डॉ. राजेंद्र वाबळे यांना निलंबित करावे.
3. या पूर्वी देखील मनपा अंतर्गत रुग्णालयांमध्ये अश्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत पण अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाहीये म्हणून आयुक्तांनी या वेळेस कठोर भूमिका घेऊन डॉ.राजेंद्र वाबळे यांना निलंबित करावे.
आम आदमी पार्टी च्या शिष्ट मंडळाने आज डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या बरोबर घटने नंतर चर्चा केली त्या वेळेस अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे,सचिव स्वप्निल जेवळे, प्रशासकीय आघाडी अध्यक्ष यल्लाप्पा वाळदोर, उद्योग आघाडी अध्यक्ष मोहसीन गडकरी, सह सचिव डॉ. संतोष गायकवाड उपस्थित होते.