Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याचा माकप कडून निषेध

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याचा माकप कडून निषेध

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजप खासदार तेजस्वी सूर्य यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध निषेध केला आहे.

माकपचे सचिव के. एम. तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “दिल्लीत विशिष्ट चित्रपट करमुक्त करण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप प्रचार करत असताना विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने मोदी सरकारची घोर अक्षम्यता उघड झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप (BJP) – आरएसएस (RSS) च्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला. आरएसएस-भाजपच्या गुंडांची अशी गुन्हेगारी अलोकतांत्रिक मानसिकता दिल्लीतील नागरिकांनी भूतकाळातही खपवून घेतली नाही आणि भविष्यातही ते सहन करायला तयार नाहीत. 

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढ थांबेना, सलग नवव्यांदा वाढ

येत्या महानगरपालिकेच्या (MCD) निवडणुकीत जनता याचे संकेत देईल. CPI(M) दिल्ली राज्य समितीने या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी गैरवापर – कॉम्रेड वृंदा करात

भाजपने केलेली हिंसक निदर्शने आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पण जे जबाबदार आहेत ते गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत दिल्ली पोलिसांच्या संरक्षणात आहेत. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि काश्मिरी पंडित आणि काश्मिरी लोकांच्या दु:खाचा गैरवापर करण्यासाठी त्यांना अशा घटना घडवाव्या लागतात हे त्यांच्या हतबलतेचे प्रदर्शन असल्याचे माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा करात यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ : केजरीवाल यांच्या घराची तोडफोड, पिंपरीत निषेध आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठा झटका, वकिलांवर ईडीचा छापा

व्हिडिओ व्हायरल : इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बाबा रामदेव संतापले


संबंधित लेख

लोकप्रिय