मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना त्यांची पहिली पत्नी करूणा मुंडे (Karuna Munde) यांना दर महिन्याला दोन लाख रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याच्या वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला सत्र न्यायालयाने दुजोरा दिला आहे. शनिवारी माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी दाखल केलेले अपील फेटाळले असून, वांद्रे न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
करूणा मुंडेंना दरमहा दोन लाख रुपये देण्याचे आदेश | Dhananjay Munde
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जफर यांनी दिलेल्या निर्णयानुसार, धनंजय मुंडे यांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाविरोधात केलेले अपील ग्राह्य धरले गेले नाही. दंडाधिकारी न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मुंडे यांना सकृतदर्शनी दोषी ठरवत, करूणा मुंडे यांना दरमहा १.२५ लाख रुपये व त्यांच्या दोन मुलांसाठी दरमहा ७५ हजार रुपये असा एकूण दोन लाखांचा अंतरिम देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला होता. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अपीलामध्ये हा आदेश चुकीचा असल्याचे सांगत दावा केला होता की, करूणा यांच्याशी त्यांनी कधीही विधिवत लग्न केलेले नाही. दोघांची ओळख एका राजकीय बैठकीत झाली होती आणि परस्पर सहमतीने त्यांचे संबंध पुढे गेले. या नात्यातून दोन मुले जन्माला आली असून, त्यांच्यासाठी आपले नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याचा दावा मुंडे यांनी केला. शिवाय, करूणा यांना आपण विवाहित असल्याचे आधीपासूनच माहित होते, असा युक्तिवाद त्यांनी केला. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)
दरम्यान, करूणा मुंडे यांनी देखील अंतरिम देखभाल खर्चाची रक्कम वाढवून ती नऊ लाख रुपये करण्याची मागणी करत स्वतंत्र अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या निर्णयामुळे करूणा मुंडे यांना दिलासा मिळाला असून, धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)