Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमाकप,सिटू कामगारांची आकुर्डीत अभिवादन रॅली,ध्वजारोहण

माकप,सिटू कामगारांची आकुर्डीत अभिवादन रॅली,ध्वजारोहण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सिटू,अ.भा.जनवादी महिला संघटना,डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया(डी वाय एफ आय),पुणे जिल्हा घर कामगार संघटना,स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस एफ आय) यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी टिळक चौक येथून दत्तवाडी,विठ्ठलवाडी,आकुर्डी मार्गे माकप आकुर्डी कार्यालय अशी मोठी दुचाकी रॅली काढण्यात आली.

आकुर्डी येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दीना निमित्त ध्वजारोहण जेष्ठ कामगार कार्यकर्ते शशिकांत महांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.जागतिक,भारतीय कामगार चळवळी व मे दिनाचा इतिहास यावर माकप पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी सांगितले की,जगातील व देशातील कामगारांना हक्क,सवलती मिळवून देणारे कायदे १ मे १८८६ रोजी शिकागो येथील आंदोलनात कामगारांच्या बलिदानामुळे मिळाले आहेत.कामगारांनी चळवळ केली नसती तर भांडवलदारांची गुलामगिरी संपुष्टात आली नसती.



मुंबईतील लाखो कामगारांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष केला,१०५ कामगारांनी बलिदान दिले,आणि मराठी भाषिक राज्य स्थापन झाले.क्षीण झालेल्या कामगार चळवळीला बळकट करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे,असे दराडे यांनी सांगितले.

सिटू लुमॅक्स युनिटचे जयप्रकाश एम जे,विकास बगाडे,पेपको युनिटचे शशिकांत महांगरे,संजय साकुर्डे,सांसेरा इंजिनियरिंग युनिटचे शिवकुमार बंगारगी , गणेश हगवणे,अनिल परीट, अरविंद पिसे,बसवराज कुडगी, राजेंद्र विसावे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.अपर्णा दराडे,सतीश नायर,अमिन शेख,एस के पोन्नपन,सचिन देसाई अविनाश लाटकर,देविदास जाधव संगीता देवळे,नंदा शिंदे,रिया सागवेकर यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय