Sunday, December 22, 2024
HomeNews"या" राज्याचे अधिवेशन मध्यरात्री २ वाजता होणार, इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार

“या” राज्याचे अधिवेशन मध्यरात्री २ वाजता होणार, इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभेचे अधिवेशन ७ मार्च रोजी होणार आहे, या अधिवेशनाची जोरदार चर्चा देशभरात सुरू असून हास्यकल्लोळ रंगला आहे. त्याच कारणही तस आहे.

राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवलेल्या अधिवेशन प्रस्तावातील त्रुटीमुळे पश्चिम बंगालचे विधानसभेचे अधिवेशन मध्यरात्री २ वाजता होणार आहे. या प्रस्तावावर राज्यपालांनीही सही केली आहे. अशाप्रकारे मध्यरात्री विधानसभा सुरू होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील “या” पर्यटन स्थळांचा समावेश

झाल असं कि, राज्यपालांना पाठवलेल्या प्रस्तावात ७ मार्च (सोमवार) लिहल्यानंतर वेळ लिहताना पीएम (प्रि- मिडनाईट) ऐवजी एएम (आफ्टर मिडनाईट) लिहिले होते. म्हणजेच टायपिंगच्या चुकीमुळे दुपारी दोन ऐवजी रात्री दोन अशी टायपिंग झाली. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन रात्री २.०० वाजता सुरू होणार आहे. 

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

या घोळानंतर राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते, मात्र, अधिकारी वेळेत राज्यपालांना भेटण्यासाठी पोहचले नाहीत. त्यानंतर राज्यपालांनी ट्वीट करत कॅबिनेट प्रस्तावाला मंजुरी दिली.

यावर विधानसभेचे सभापती बिमान बॅनर्जी म्हणाले, ही टाईप मिस्टेक आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती, पण त्यांनी रात्री २.०० ही झालेली चुक मान्य केल्याने आता विधानसभेचे अधिवेशन हे रात्रीच सुरू होणार आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचे सरकार ११ मार्च रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे.  या अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय