Chakan Shikrapur Road Accident : चाकण-शिक्रापूर महामार्गावर गुरुवारी (16 जानेवारी) दुपारी एका भरधाव मालवाहतूक कंटेनरने तब्बल 20 किलोमीटर अंतरावर धडकांची मालिका घडवली. या अपघातात तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून, अनेक दुचाकी, फोरव्हीलर आणि पोलिस वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
अपघाताची सुरूवात (Chakan Road Accident)
चाकण येथील माणिक चौकात कंटेनर चालकाने दोन महिलांना धडक दिली. त्यानंतर भीतीपोटी तो वेगाने शिक्रापूरकडे निघाला. वाटेत मेदनकरवाडी फाट्यावर एका पाच वर्षांच्या मुलीला कंटेनरने उडवले. पुढे शेल पिंपळगाव येथे सेलेरो कार आणि एका दुचाकीला धडक दिली. चौफुला येथे एका टाटाएस गाडीला पलटी केली. अशा तब्बल 15 वाहनांना कंटेनरने धडक दिली.
पोलिसांचा पाठलाग
चाकण पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पाठलाग सुरू केला. बहुळ गावात कंटेनरला रोखण्याचा प्रयत्न करताना कंटेनरने पोलिसांची एर्टिगा वाहन उडवली. यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाला.
संतप्त नागरिकांची बेदम मारहाण
शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी अखेर कंटेनरला वाजेवाडी येथे थांबवले. संतप्त नागरिकांनी चालकाला खाली ओढून मारहाण केली. चालक अकिब खान (वय 24, रा. हरियाणा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालक मद्यप्राशन केलेला असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. या घटनेमुळे चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला या परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहनधारक आणि नागरिकांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी
अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता
मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी
‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण
नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू