Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी

8th Pay Commission : केंद्र सरकारने बहुप्रतिक्षित आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) गठीत करण्यास मंजुरी दिली आहे. गुरुवारी (16 जानेवारी) केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

---Advertisement---

सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वेतन आणि निवृत्तीवेतन सुधारण्यासाठी मागणी करत होते. अखेर केंद्र सरकारने त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत आठव्या वेतन आयोग गठीत करण्यास मंजुरी देण्याची घोषणा केली आहे.

8th Pay Commission कशासाठी?

वेतन आयोगाची मुख्य भूमिका म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारशी करणे. यामध्ये वेतनरचना, फिटमेंट फॅक्टर आणि इतर आर्थिक बाबींचा समावेश असतो. सातवा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला होता, ज्याच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळाले होते.

---Advertisement---

आठव्या आयोगाची व्याप्ती आणि महत्त्व

आठवा वेतन आयोग महागाई आणि वाढत्या राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आयोगाची व्याप्ती आणि शिफारशींचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी, प्रसारमाध्यमांनुसार या वेळी महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.

आयोगाच्या अंमलबजावणीबाबत कालमर्यादा अद्याप ठरलेली नाही

सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी कोणतीही ठोस कालमर्यादा निश्चित केलेली नाही. तथापि, मागील वेतन आयोगांच्या शिफारशींच्या प्रक्रियेप्रमाणे, तपशीलवार पुनरावलोकनानंतर बदल लागू होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आठवा वेतन आयोगाच्या पुढील टप्प्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता

मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles