Monday, December 23, 2024
Homeजुन्नरजुन्नर : राजुरी मध्ये रासेयो मार्फत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

जुन्नर : राजुरी मध्ये रासेयो मार्फत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

जुन्नर / विजय चाळक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्टीय सेवा योजना व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स काॅलेज ऑफ इंजिनिअरींग आणि समर्थ काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स, बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर राजुरी (ता.जुन्नर) येथे २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.

शिबिराचे उदघाटन माजी सभापती दिपक औटी व सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या शुभहस्ते झाले. या शिबिरातील विद्यार्थ्यांनी जल संवर्धन ही काळाची गरज ओळखून नियोजनबद्ध रित्या गावचे सर्वेक्षण करून बंधाऱ्यांविषयी माहिती संकलित केली. आणि डोबी डुंबरे मळयातील ओढयावर श्रमदानातून ३ ठिकाणी वनराई बंधारे बांधले. यामध्ये एका ओढयाला वाहते पाणी आडवून त्या ठिकाणी २०० सिमेंट च्या गोणींमध्ये वाळू भरून त्या एकमेकांवर रचत चार-पाच थर तयार करून हा बंधारा बांधला. हे बंधारे बांधल्याने पूर्वेकडून येणारे पाणी बऱ्याच अंशी अडवले जाऊन त्याचा विहिरी, बोरवेल व शेतीपूरक उद्योगधंद्यासाठी विनियोग होणार असून पूर्ण परिसर जलमय होणार आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरताना आपण समाजाचं काही देणं लागतो. या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेतील १२५ विद्यार्थ्यांनी राजुरी गावचे सर्व्हेक्षण करून या बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंवर्धन-पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तिमंत स्वरूप प्राप्त करून दिल्याने स्थानिकांकडून कौतुक केले.

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार !

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप, डॉ.अनिल पाटील, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, रासेयो समन्वयक प्रा.विपुल नवले, कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, बाळू हाडवळे, गोपाळ नाना हाडवळे, अशोक हाडवळे, नंदू हाडवळे, बाजीराव हाडवळे, स्वप्नील हाडवळे, वसंत हाडवळे, ममताराम हाडवळे, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर, शाकिर चौगुले, निलेश हाडवळे आदी मान्यवर तसेच स्थानिक शेतकरी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांकडे पाहून सरपंच व स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. जवळपास १ लक्ष ५० हजार रुपये चे बंधाऱ्यांची कामे झाल्याची माहिती मुक्तामाता मंडळ डोबी डुंबरेमळ्याचे अध्यक्ष बाळू हाडवळे यांनी माहिती दिली. सर्व ग्रामस्थांचे या कामी विशेष सहकार्य लाभले. सर्व उपस्थितांचे डॉ.लक्ष्मण घोलप यांनी आभार मानले.

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

ब्रेकिंग : IPL च्या 15 व्या सीजनचे वेळापत्रक जाहिर, जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख

लोकप्रिय