मुंबई : श्री कुकडेश्वर हिरडा कारखान्याला अनुदान मिळावे या मागणीसाठी कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे यांनी दि. २६ जानेवारीपासून जुन्नर तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण केले होते. आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आदिवासी विकास विभागासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते.
जुन्नर : मनरेगाच्या अंमलबजावणीतील अडचणीवर सकारात्मक चर्चा
आज (दि.११) रोजी हिरडा कारखान्याला अनुदान देण्याबरोबरच विविध प्रश्नांबाबत बैठक शुक्रवारी (दि.११) राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
जेष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन !
या बैठकीस आमदार अतुल बेनके, हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे, अॅड.नाथा शिंगाडे, दत्तात्रय गावरी, मारुती वायाळ आदीसह उपस्थित होते.
या बैठकीत हिरडा कारखान्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, तसेच प्रस्तावित रक्कम तातडीने वर्ग करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यानी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे काळू शेळकंदे यांनी सांगितले.
आयपीएल २०२२ चा लिलाव सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले