न्यू दिल्ली – जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये काल पहाटे पासून हिमवृष्टी सुरू झाली आहे. गुलमर्गसह खोऱ्यातील वरच्या भागात सहा ते दहा इंच बर्फ साचला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये थोड्या हिमवृष्टीनंतर २० डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. (Cold wave)
उत्तर भारतात जोरदार थंडीची लाट असून त्यामुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही जोरदार गारवा जाणवत आहे. राजधानी दिल्लीत तापमान ५ अंश नोंदले गेले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सतत उत्तर-पश्चिमेकडून थंड वारे वाहत आहेत. उंचावरील डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. यादरम्यान बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारे वारे दिल्लीला हादरवून सोडत आहेत.
पाकिस्तानवरून जोरदार थंड वारे वाहत आहेत, त्यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रचंड गारठा वाढला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा ९ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. (Cold wave)
राजस्थानच्या ‘सिकार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही गारठा वाढत आहे. धुळ्यासह, परभणी, नागपूर, निफाड, गोंदिया, वर्धा येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.थंडीचीही लाट पुढचे 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास
Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल