पुणे : पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) पाठोपाठ पुण्यात (Pune) सीएनजी देखील महागल्याने पुणेकरांना मोठा झटका बसला आहे. पुण्यात आणखी एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो मागे पाच रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
आजच्या दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचे (CNG) दर 68 रूपये प्रति किलोवरून 73 रूपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहेत. सीएनजीचे नवे दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.