पुणे : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून आज आशा पातोंड व स्नेहलता यनभर या दोन महिलांचे अर्ज प्रातिनिधिक स्वरुपात स्विकारण्यात आले. (Ladki Bahin Yojana)
राज्यातील २१ ते ६० वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलेल्या महिलांना ही योजना लागू असून या योजनेंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपये दरमहा लाभार्थी महिलेच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्य शासन समाजहिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र भगिनींना लाभ होईल असे महाजन यांवेळी म्हणाले.
महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. आज जिल्हा परिषदेतर्फे योजनेअंतर्गत १०० लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
हेही वाचा :
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद