नाशिक : मोहाडी जानोरी रस्त्यावरील सतराव्या शतकातील पुरातन महादेव मंदिराजवळील बारव व परिसराची रविवार (दि.12) शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संस्थेने बारावेतील झाडे, केरकचरा घाण झालेले पाणी काढून स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे व महादेवाचे पूजन करून झाली. कर्मवीर रा.स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी सोमवंशी व सार्वजनिक वाचनालय नाशिक बाल भवन विभाग प्रमुखपदी संस्थेचे सल्लागार सोमनाथ मुठाळ यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
अध्यक्षीय भाषणात शहाजी सोमवंशी यांनी आपल्या परिसराची व पर्यावरणाची जबाबदारी आपलीच असते. काळाची पावले ओळखून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धन ऐतिहासिक वास्तूचे संगोपन करणे गरजेचे. छोटेखानी कार्यक्रमाची पुर्णाहुती करून नंतर बारवेचे दिवसभर श्रमदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सोमवंशी यांनी केले. संस्थेच्या कार्याचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन धनंजय वानले यांनी केले, आभार प्रदर्शन संस्थापक भाऊसाहेब चव्हाणके यांनी केले. दिवसभर चाललेल्या श्रमदानात संस्थेचे भाऊसाहेब चव्हाणके, सोमनाथ मुठाळ, सचिन भामरे, भरत ब्राह्मणे, संजय बोडके, अजय कापडणीस, गणेश घोलप, अनुप गायकवाड, दिलीप सोनवणे, आशिष घोलप, समाधान जाधव, अमोल घोलप, वैष्णवी चव्हाणके, बाळनाथ जाधव, कचरू वैद्य, संदीप कांदे, राजेंद्र कट्यारे, सुयशा चव्हाणके, तनिष्का ब्राह्मणे, कुणाल ब्राह्मणे, रुद्राक्ष चव्हाणके, सोहम सोनवणे, साहिल सोनवणे, शंभू जाधव, क्रांती चव्हाणके, अनन्या टक्कर शिलेदारांनी योगदान दिले.
कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी
तसेच धनंजय वानले, तुकाराम जोंधळे, लक्ष्मण देशमुख, गोविंद मौले, नंदकुमार डिंगोरे, अशोक केंग, रामदास जाधव, शंकर ठाकूर, पंडित मौले, दत्ता जाधव, केशव जाधव, मनोज मोगरे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.