Sunday, June 30, 2024
Homeजिल्हाAkola : सरकार कडून गटप्रवर्तकांची झालेली फसवणूक सीटू कदापीही सहन करणार नाही...

Akola : सरकार कडून गटप्रवर्तकांची झालेली फसवणूक सीटू कदापीही सहन करणार नाही – कॉ.आनंदी अवघडे

अकोला : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे १० हजार रुपये मानधन वाढीचा शासन निर्णय सरकारने या अधिवेशनात काढून राज्यातील गटप्रवर्तकांची नाराजी दूर करावी. अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा सीआयटीयु संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष कॉ.आनंदी अवघडे यांनी 27 जून रोजी अकोला येथे एमआरएसएम सभागृहात आयोजित गटप्रवर्तकांच्या एल्गार मेळाव्याचे उद्घाटन करताना व्यक्त केले. (Akola)

अकोला जिल्हा सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. राजन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला फेडरेशनच्या राज्य महासचिव कॉम्रेड पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन करताना असे म्हटले की, लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांच्या मानधनात १० हजार रुपयांची मासिक वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात शासकीय निर्णय काढताना फक्त १ हजार रुपयाची मासिक वाढ केली. ही गटप्रवर्तकांची शुद्ध फसवणूक असून या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे १० हजार रुपयाची गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी. अन्यथा २ जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर कृती समितीच्या नेतृत्वात राज्यभरातील गटप्रवर्तक प्रचंड मोर्चा काढणार आहेत. त्याच प्रमाणे संघटनेचे महत्व आणि पुढील आंदोलनाची दिशा या बाबत सूद्धा पुष्पा पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. (Akola)

या २ जुलैच्या मुंबई मोर्चात आकोला जिल्ह्यातील 100% गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन गावंडे, सचिव संध्या पाटील, राज्य कौन्सिल सदस्य मिना गेबड, कोषाध्यक्ष रूपाली धांडे यांनी उपस्थित गटप्रवर्तकांना केल.

यावेळी सर्व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने जिल्ह्यातील गटप्रवर्तक उपस्थित होत्या. अकोला जिल्ह्यामध्ये गटप्रवर्तकांची समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्याचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक राजन गावंडे केले तर उपस्थितांचे आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय