चिखली (पिंपरी चिंचवड) : धोकादायक डीपी बॉक्स बदला, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने महावितरणला देण्यात आला आहे.
चिखली- प्रभाग क्र 2 जाधववाडी, कुदळवाडी मधील अनेक ठिकाणी विद्युत लाईट डीपी बॉक्स खराब झाले आहेत. काही ठिकाणी बॉक्स वाकले आहे. काही ठिकाणी बॉक्स गंजलेले आहे. तर अनेक ठिकाणी डीपी बॉक्स ची झाकणे गायब आहेत, यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शकता आहे.
लहान मुले खेळत असतात, नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून महावितरण कंपनीने ही अडचण लक्षात घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी महावितरण अधिकारी रमेश सूळ यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच महावितरण कर्मचारी यांना पण वारंवार माहिती दिली आहे, येत्या महिनाभरात जर उपाय योजना झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना प्रमुख कार्यकर्ते राजु भुजबळ यांनी महावितरण मोशी चिखली कार्यालयास दिला आहे.