नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे ऐतिहासिक निर्देश दिले आहेत. (Assets of Judges) १ एप्रिल २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्व विद्यमान न्यायाधीशांनी आपली संपत्ती उघड करायची आहे आणि ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
काही दिवसांपुर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा (Yashwant Verma) यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला तिथे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. यानंतर न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. नंतर आता सरन्यायाधीशांनी संपत्ती उघड करायचे निर्देश दिले आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
न्यायाधीशांना संपत्ती जाहीर करण्याचे निर्देश | Assets of Judges
या निर्देशानुसार, प्रत्येक न्यायाधीशाला आपली संपत्ती आणि मालमत्तेचा तपशील जाहीर करावा लागेल. यामध्ये स्थावर मालमत्ता (जमीन, घरे), जंगम मालमत्ता (बँक ठेवी, शेअर्स, वाहने) आणि इतर आर्थिक गुंतवणुकीचा समावेश असेल. (Assets of Judges) ही माहिती संकलित करून ती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर एका विशिष्ट प्रारूपात प्रसिद्ध केली जाईल. (हेही वाचा – यूपी सरकारच्या बुलडोजर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, 60 लाख रुपयांचा दंड, पीडितांना नुकसान भरपाईचे आदेश)
दरम्यान, या निर्णयाचे विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. (हेही वाचा – अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क आकारणार)