Chandrapur: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Loksabha) महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात पहिली सभा झाली. या सभेत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून करत विरोधकांवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भारत आघाडीवर निशाणा साधत काँग्रेसचे धोरण विभाजनाचे असल्याचे सांगितले.
भाजप आणि एनडीए यांचे ध्येय देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि INDIA आघाडीची युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली. काँग्रेस ही समस्यांची जननी आहे, विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला. विकासकामांना सातत्याने विरोध केला. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा योजना सुरु केल्या आहेत. असे मोदी म्हणाले.
यावेळी पीएम मोदींनी काँग्रेसला कडबा म्हंटले आणि ते कधीच सुधरणार नाही. एकतर तुपात तळा किंवा साखरेत मिसळा. जनादेश लुटून सत्तेत आल्यावर त्यांनी केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास केला, असा घणाघातही पंतप्रधान मोदी यांनी केला. देशातील सर्व समस्यांचा उगम काँग्रेस असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.


हे ही वाचा :
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू