करोना कालखंडामध्ये बंद करण्यात आलेला ही पर्यटन व्हीजा सकाळी केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचा लाभ 156 देशातील नागरिकांना होणार आहे. या सर्व देशातील नागरिकांसाठी देण्यात येणारा नियमित पर्यटन व्हिजा आता मिळणार असून याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !
जपान आणि अमेरिका यासारख्या देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा दहा वर्षांसाठी चा नियमित पर्यटन व्हिजाही पूर्ववत करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने आज घेण्यात आला आहे. भारतामध्ये मागच्या वर्षी कोरोना रुग्णसंख्या चे प्रमाण वाढल्याने अनियमित कालखंडासाठी पर्यटन व्हीजा बंद करण्यात आला होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून करोना रुग्ण संख्या कमी झाल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा परदेशी पर्यटकांना होईल.
ब्रेकिंग : जपान 7.1 रिस्टर स्केलच्या भूकंपाने हादरले
क्रूड तेलाचे भाव घसरले, इंडियन ऑईलने रशियाकडून खरेदी केले कच्चे तेल
आमदारांच्या निधीत घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरच्या पगारात सुध्दा वाढ