Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून बारामतीत कामगार दिन साजरा

आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून बारामतीत कामगार दिन साजरा

बारामती(क्रांतिवीर रत्नदीप) : आयएसएमटी कामगार संघटना बारामती यांचे वतीने जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कामगार बंधूंनी मातृ-पितृ चरण पूजन करून आई-वडिलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यानंतर आई-वडिलांनी मुलांना आशीर्वाद दिले. उपस्थित कामगार बंधूंनी टाळ्या वाजवून या कार्यक्रमाला दाद दिली. त्यानंतर विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ भिकोबा नगर पणदरे या प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींनी कष्टाचा रुपया हे नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.



मान्यवर मंडळींचा सत्कार संघटनेच्या प्रतिनिधींनी केला त्यानंतर लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात आली .त्यामध्ये प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आल्या .यानंतर मायबोली महाराष्ट्राची हा जुन्या नव्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला चांडाळ चौकडी फेम अभिनेते रामदास जगताप यांनी विशेष हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम, जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे , उपाध्यक्ष शिवाजी खामगळ, खजिनदार रवींद्र गिरमकर ,सल्लागार संतोष साळवे, रमेश लोखंडे ,सदस्य सुरेश दरेकर, संजय सस्ते ,सुनील पोंदकुले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी दरेकर यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय